डेन्मार्क हा देश भारतात फार लोकांना परिचित नाही, पण गेल्या वर्षांमधे ह्या देशाबद्दल उत्सुकता वाढली आहे, आणि परिणामस्वरूपी डेन्मार्क मधे भारतीय लोकांची वाढ दिसून येते. अर्थातच मराठी लोकांची ओघाने वाढ झाली आहे. तसा तर हा देश फार लहान आहे, पण कोपनहेगन मधे बर्याच प्रमाणात मराठी लोक स्थाईक झाली आहेत. नवीन देशात लवकरात लवकर जम बसवण्याचा सर्वांचाच संकल्प असतो, पण एका किवा दुसर्या कारणास्तव बर्याच वेळा जम बसवायला खूप वेळ लागतो.
भाषा, जेवण, कलाकृती इत्या. कुठल्याही समाजाला एकत्र आणण्यात खूप मदत करतात, आणि तेच कारण असाव कि मराठी भाषिक लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क ची २०१२ साली स्थापना केली. आपल्या भाषेतलं मंडळ दिसल कि निश्चितपणे नवीन आलेल्या समभाषिक लोकांना मदत करता येणं हे कुठल्याही मंडलाच उद्देश्य असत. त्याच उद्देश्यानी मंडळाच्या जुन्या सभासदांनी त्यांचे अनुभव उतरून काढले आहेत, जेणे करून नवीन आलेल्या मराठी भाषिक लोकांना जास्तीत जास्त मदत ह्वावी.
हा लेख विविध विभागात मांडला आहे, जेणेकरून व्यावहारिक आणि सामाजिक गोष्टींची थोडीशी माहिती मिळेल, अशी अपेक्षा आहे. आपण डेन्मार्क बद्दल माहितीच्या मुख्य अंकावर क्लिक करून वेगवेगळ्या विभागांच्या अंकांवर जाऊ शकता.