डेन्मार्क मधे लायसन्स मिळवणं हे आयुष्यातलं खूप मोठं प्रकल्प आहे. वेळ आणि पैसा खर्च करायची मुबलक तयारी ठेवा. गाडी पहिल्यांदा चालवायची असेल, तर साधारण १ वर्ष वेळ, आणि २०००० क्रोनर खर्च करायची तयारी ठेवा. अर्थातच हा अंदाज तंतोतंत प्रत्येक व्यक्तीला लागू होत नसून, लोकांच्या अनुभवावर मांडला आहे. महत्वाचं म्हणजे हे समजणे कि ह्या प्रकल्पाला अजिबात लहान मानू नये.
गाडी चालवण्याची भारतात सवय जरी असेल, तरी सुद्धा इकडे लायसन्स मिळवणं सहज मानू नये. अर्थातच, चालवण्याचा अनुभव आणि सवय असेल तर थोडसं सोपं जातं. भारतात लायसन्स मिळालं असेल तर ते इथे दानिश लायसन्स शी बदली करू शकता, पण लेखी आणि practical परीक्षा द्याव्याच लागतात. ह्या साठी पण वेळ आणि पैसा काढण्याची तयारी ठेवावी. पालिके कडनं ३ महिन्या करता तात्पुरता (temporary) डेनिश लायसन्स मिळू शाक्त, जर का आधी पासनं भारतच लायसंस असेल तर. पण त्या नंतर वेळेत वाढ करून मिळण्याची ग्वाही नाही. शिवाय बऱ्याच पालिकांनी ही सोया बंद केलंय त्यामुळे कृपया आपल्या क्षेत्रातील पालिकेशी ह्यासंधार्बत संपर्क साधावा.
अभ्यासक्रम माहिती करून घेण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी ठीक ठिकाणी लायसंस च्या शाळा आहेत. पण इथे स्थाईक झालेल्या लोकांशी बोलून ह्या बद्दल अधिक माहिती मिळवावी.