रोज कोपनहेगन चा वेगळा पैलू मनाला भावतोच.त्यांची स्वच्छता,नियम पालन हे अगदी सगळयांनी मान्य केलंय त्या पेक्षा निराळं जे वाटतं ते लगेच शब्दांत गुंफण करावं वाटतं.
इकडे मला सगळ्यात भावलं ते डॅनिश लोकांचं सायकल प्रेम,एकदम भारी भारी सायकली पार्किंग मध्ये दिसतात.छोट्या तीन वर्षांच्या मुलांपासून ते ऐशी वर्षाच्या आजी आजोबां पर्यंत सगळ्यांच्या सायकली असतात.
शुक्रवार यांच्या आवडीचा असतो.पाच दिवस काटेकोरपणे काम करायचं आणि शुक्रवारी संध्याकाळी घरी आल्यानंतर सोमवार सकाळपर्यंत जे सगळे खुश. खाना पीना सबकुछ करतीलच पण .....जिम ला सुट्टी नाही तसं त्यांच्या मस्त सायलकी बाहेर निघतात आणि पूर्ण कुटुंब सायलकीवर समुद्राच्या काठी येतील ...त्यांची ती सायकल फेरी ,पॅशन,जिगर खूप आवडून गेली.जे करतील त्यात आनंद.
आम्ही काय केलं ,दुचाकी आली की सायकल अडगळीत घालवली धन्य झालो दुचाकीने,चारचाकी आल्यावर तर सायकल पार विसरून गेलो.कोणी व्यायाम म्हणून वापरत असेल तर ऍक्टिवा वर बसून त्याला विचारू लागलो
"अरे यार,अजून पायडलं मारतोस का रे?
ती सायकल आपण न वापरण्याची फुशारकी मारू लागलो आणि मग वाट लागली आपल्या पुण्याची अतोनात दुचाक्या आणि त्याच्या धुरानी.सगळं सरकार नसत करत. मूळ आपण असतो. कोपनहेगन च्या बस स्टँड वर आठ नऊ वर्षाची मुलं मुली हेल्मेट घालून स्वतः त्यांच्या छोट्या सायकलवर येतात पार्क करतात,मग स्कूल बस नि जातात.
लोक मेट्रोच्या प्रवासात सायकली नेतात आणि स्टेशनवर उतरून कामावर सायकलने जातात.
जगातील सायकल चालवणाऱ्या पहिल्या दहा देशात डेन्मार्क चा चौथा क्रमांक आहे. आधी हिरवाई,लोकं कमी,धुराची वाहन नाहीत,त्यात भर हे सायकल वेड.मस्त हवेत गारवा घेत सगळे गोरे , सुबक कोरीव डॅनिश आनंदात सायकली चालवतात. अर्थात या इथल्या गोऱ्या मुलींना आपल्या सायकलीवर स्वार होऊन गाणं गात जाणाऱ्या नूतन ची सर मुळीच येणार नाही ,हा भाग नमूद करायला हवाच.
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)