आपात्काली आजार वगळता सर्व आजारांसाठी सामान्य डॉक्टरकडे (General Practitioner) सर्वप्रथम फोन करून जायला लागत. आपल्या CPR नंबर च्या कार्डावर ह्या डॉक्टरची माहिती छापलेली असते. डॉक्टरची निवड CPR नंबरची नोंदणी करतानाच करावी लागते. स्थलांतराच्या वेळी पुन्हा एकदा जवळच्या डॉक्टरची निवड करावी लागते. साधारण जवळपास डॉक्टरची निवड कारण योग्य ठरेल.
डॉक्टर चं मानधन हे समाजाच्या कर भारती मधन दिलं जातं, म्हणजेच आपण (त्या क्षणी) विनामुल्य डॉक्टरची सेवा उपलब्ध करू शकतो. आणि हे नियम सगळ्यांना लागू होतात, मग कोणी नोकरी करत असो किवा नसो.
डेन्मार्क मधे औषद देण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. बर्याच आजारांवर फक्त विश्रांती किवा आणखीन दिवस काढायला सांगतात. ह्या मागच्या कारणांमध्ये न जाता हे मात्र नक्की कि हि पद्धत भारतापेक्षा खूप वेगळी आहे. आपल्या कडे छोट्यातल्या छोट्या आजारांवर सुद्धा औषद देण्याची प्रथा आहे. ती डेन्मार्क मधे मुळीच नाही.
डॉक्टरची साधारण वेळ सकाळी ८ – संध्याकाळी ५ पर्यंत असते. ह्या वेळेपलीकडे आपात्काली व्यवस्था वापरावी लागते, ज्याची माहिती त्या विभागात दिली आहे.