ह्या देशात शिक्षण चार भागात विभागले गेले आहे.
1. प्राथमिक शाळा
2. Gymnasium
3. बॅचलर शिक्षण
4. पुढचं शिक्षण
सर्व शिक्षण मोफत आहे, पण अर्थात ह्याचे पैसे टॅक्स मधून नोकरी किवा व्यवसाय करणार्या वर्गा कडून घेतला जातो. बॅचलर आणि masters च्या शिक्षणासाठी सरकार कडून भत्ता सुद्धा मिळतो. डॉक्टरेट ला तर पगार मिळतो, ज्याने आरामात शिक्षणाची वर्ष काढू शकतो.
दोन प्रकारच्या शाळा डेन्मार्क मधे उपलब्ध आहेत.
सार्वजनिक शाळा (public schools)
खाजगी शाळा (private schools)
प्रत्येक मुलाला एक शाळा महानगर पालिके कडनं राहण्याच्या जवळपासच्या आवारात जोडली जाते. पालकांना शाळा निवडायची पूर्ण मोकळीक आहे, पण पालिके ने जोडलेल्या शाळे व्यतिरिक्त दुसरी शाळा हवी असेल, तर त्या शाळेच्या रिकाम्या जागेंवर अवलंबून आहे, कि मुलाला जागा मिळेल कि नाही.
शालेय शिक्षण साधारण वयाच्या ६ वर्षा पासन सुरु होत. नौवी इयत्ता पर्यंत सगळ्यांना शिक्षण एकसारखं असत, आणि दहावी इयत्ते ला काही मुल स्वतः निवड करून एक वर्ष आणखी शालेय शिक्षण घेतात.
शालेय शिक्षणात सर्वांगीण विकासावर भर दिलं जातो, पण खाजगी शाळांन मधे (फ्री शाळा वगळता) अभ्यासावर बराच भर असतो.
संपूर्ण शिक्षण विनामुल्य असत, आणि शाळेच्या वेळा साधारण सकाळी ८ – दुपार ३ पर्यंत असतात. त्या नंतर मुले क्रीडा/कलाकृती केंद्रात वेळ घालवतात, जिथे पैसे भरावे लागतात. प्रत्येक केंद्रावर त्यांची शुल्क अवलंबून असतात, पण साधारण १००० – १५०० दानिश क्रोनर महिना भरावे लागतात. अर्थातच हे केंद्र अनिवार्य नसून, स्वतः ठरवू शकतो कि मुलांना तिकडे पाठवायचं कि नाही. पण कामावर जाणार्या दाम्पत्यांना आणि मुलांच्या सारासार वाढी साठी ही केंद्र उपयुक्त ठरतात.
मनात योजलेल्या खाजगी शाळेत पाठवण्यासाठी खूप अधिपासून तयारी करावी लागते. मुलाचा जन्म झाला कि शाळेत नोंदणी करणे उपयुक्त ठरते, नाही तर जागा मिळणे जवळपास अशक्य होऊन जाते. शाळेचे दोन प्रकार आहेत.
दानिश खाजगी शाळा
आंतरराष्ट्रीय शाळा
दानिश खाजगी शाळा
शाळेचा प्रकार सार्वजनिक शाळांन सारखाच, पण अभ्यास आणि कारकिर्दी वर जास्त भर दिलं जातो. महिना साधारण ३००० दानिश क्रोनर सुद्धा भरावे लागतात.
एक दुसर्या प्रकारची दानिश खजि शाळा म्हणजे फ्री शाळा (free schools), जिथे कुठला तरी एक विषया वर जास्त भर असतो, उदा. संगीत, क्रीडा, धर्म, इत्या. अभ्यासक्रम सगळ्या शाळेन सारखाच असतो, पण नुसतचं अभ्यासावर लक्ष्य केंद्रित नसत.
आंतरराष्ट्रीय शाळा
ह्या शाळेन मधे नोंदणी मिळवणे थोडे कठीण आहे, प्रामुख्याने जर का शहरातली मनासारखी शाळा हवी असेल तर. रुगार्त्स आणि कोपनहेगन आंतरराष्ट्रीय शाळा अतिशय प्रसिद्ध आहेत, आणि त्या मुळे शिरकाव मिळणे जवळपास अशक्य आहे. शहर बाहेरच्या शाळा सुद्धा चांगल्या आहेत, उदा. होर्शोल्म, रोस्कील्डे मधल्या शाळा, पण शहर पासन थोड्या लांब आहेत.
शाळेचे शुल्क साधारण ३००० दानिश क्रोनर असते. खूप दाणगा अभ्यासक्रम असतो, पण अभ्यासाव्यातिरिक्त इतर पैलून मध्ये सुद्धा मुलांची वाढ करण्या मागे श्रम घेतले जातात. वाढत्या भारतीय लोकसंख्ये मुळे, शाळेत प्रवेश मिळणे अधिक कठीण होत आहे. त्याच बरोबर शाळा सुद्धा ज्या लोकांचा जास्त काळा साठी स्थाईक होण्याचा विचार आहे, त्या लोकांना प्रवेश देण कठीण करत आहे.
मुलांच्या शाळेनंतर Gymnasium मधे मुलं प्रवेश घेतात. हे आपल्या कडचं ११ आणि १२ वर्गा सारखं आहे. इथे ३ वर्षांचं शिक्षण घेतलं जातं.
Gymnasium नंतर युनिवर्सिटी मधे प्रवेश मिळवू शकतो. इंजिनियरिंग साठी DTU, आणि Aalborg युनिवर्सिटी प्रसिद्ध आहेत. इतर क्षेत्रांसाठी Copenhagen युनिवर्सिटी, Aarhus युनिवर्सिटी प्रसिद्ध आहेत.
बॅचलर च्या शिक्षणा नंतर मास्टर्स आणि डॉक्टरेट चं शिक्षण घेऊ शकतात. त्या साठी बॅचलर प्रमाणेच DTU, आणि Aalborg युनिवर्सिटी प्रसिद्ध आहेत. इतर क्षेत्रांसाठी Copenhagen युनिवर्सिटी, Aarhus युनिवर्सिटी प्रसिद्ध आहेत.