गाडी विकत घेणं म्हणजे संपत्ती मधे मोठा खड्डा खोदण्या सारखं आहे. गाडी वर प्रचंड प्रमाणात कर लादला जातो, आणि गाडीच्या किमतीवर अवलंबून तो १०५ – १५० % असा आहे. त्या मुळे, डेन्मार्क मधे गाडी खरेदी हा एक मोठा प्रकल्प आहे. तरी सुद्धा बहुतांश लोकां कडे एक गाडी आहे. काही कुटुंबां कडे दोन गाड्या आहेत.
आपण जर का शहराच्या साधारण मध्य भागात राहत असू तर आपल्याला गाडी खरेदीची फार गरज नाही आहे. शहरात सार्वजनिक प्रवासाची सोय उत्तम आहे. पण हवामानाचा अनुभव लक्षात घेता, प्रकर्षाने लहान मुलांचे कुटुंब असतील तर गाडी असणं एक गरज होऊन जाते. म्हणून बराच काळ जर का इथे राहण्याचा विचार असेल तर गाडी खरेदी बद्दल नक्की गंभीर विचार केला पाहिजे.
ह्या गोष्टी विचार करण्या सारखे आहेत.
1. गाडी किती जुनी आहे ?
2. किती km चालवलेली आहे?
3. पेट्रोल किवा डिझेल किवा इलेक्ट्रिक ?
4. गाडीची अवस्था
5. किती लोकं आरामात बसू शकतात
6. पाठी बसणार्यांना पुरेशी जागा आहे का, प्रकर्षाने पायाला?
7. सामान ठेवायला पुरेशी जागा आहे का ?
8. लहान पोरांची उपकर्ण, म्हणजे बाबा गाडी इत्या. ठेवायला जागा आहे का ?
9. गाडीचं synstest झाला आहे का ?
10. गाडीची चाक किती जुनी आहेत?
11. उन्हाळा आणि थंडीची चाक उपलब्ध आहेत का ?
12. गाडीचा इन्शुरेंस
13. पार्किंग ची जागा
14. गाडीचा प्रमुख उपयोग
गाड्यांचे शोरूम Søborg भागात बरेच आहेत. इथे प्रामुख्याने नवीन गाड्या विकल्या जातात. पण इतर माध्यम सुद्धा वापरू शकतो. उदाहरण म्हणजे bilbasen.dk, dba.dk. पण काही लोकांच्या ओळखीचे मेकॅनिक पण असतील ज्यांच्या कडून विकत घेऊ शकतो.
तीन प्रकार आहेत.
1. नवीन गाडी – गाडी ची कींमत अर्थात कुठली गाडी घेतोय त्यावर अवलंबून आहे. स्वस्तातल्या गाड्या साधारण २००००० DKK पर्यंत मिळतात. गाड्यांचा आकार लहान मिळतो, तरी सुद्धा ५ लोकांची बसण्याची सोय असते. टोयोटा औरीस, renault, फोर्ड fiesta च्या गाड्या ह्या वर्गात मिळतील. मध्यम किमतीच्या गाड्या २००००० – ३००००० पर्यंत मिळतील. ह्या गाड्या अतिशय लोकप्रिय आहेत. बसायला आणि सामान ठेवायची जागा मुबलक मिळू शकते. स्कोडा ओक्टेविया, फोर्ड फोकस ह्या किमतीच्या वरच्या गाड्या साधारण महाग वर्गात जातात. ह्या किमतीच्या वरच्या गाड्या महाग वर्गात जातात. ऑडी, फोक्सवॅगन, मर्सिडीज इत्यादि गाड्या ह्या वर्गात मिळतील.
2. जवळपास नवीन गाडी – म्हणजे Demo गाडी, जी साधारण ५००० – १०००० km चाललेली असते. जर का नवीन गाडी घेण्याचं बजेट असेल तर हा पर्याय निवडायला काहीच हरकत नाही, कारण गाडीची कींमत नवीन गाडीच्या तुलने मध्ये १५-२० % कमी होऊ शकते. गाडीची अवस्था बर्यापेकी नवीन असते कारण फार चालवलेली नसते.
3. वापरलेली गाडी – ह्या गाड्या अगदी १०००० पासून ते हव्या त्या किमतीत मिळू शकतात. पण अगदी काळजी पूर्वक घेणं गरजेचं असतं कारण अवस्थेवर अवलंबून गाडीवर सतत खर्च होऊ शकतो.