महानगर पालिके कडनं मुलांचे पाळणाघर चालवले जातात. वयवर्ष ६ महिने ते मुल शाळेत जाई पर्यंत (६ वर्ष) ची सोय असते. अतिशय सुंदर व्यवस्था असते जेणेकरून पालकांना मुलांची कामाच्या वेळात (साधारण सकाळी ७ – संध्याकाळी ५) काळजी करण्याची गरज नसते. ह्या संस्थे मधे मुलांकडे बघणारे मोठी माणस ह्या क्षेत्रात उत्तम शिक्षण घेऊन आलेले असतात.
मुलांची जेवणाची सोय इथे बघितली जाते. खाण्यावरची काही बंधन असतील तर ते सुद्धा पाळले जातात. खेळायला खूप मोठा आवार असतो, आणि १ - ३ वर्षांच्या बाळांना झोपायची सोय सुद्धा उत्तम असते.
नोंदणी करण्या साठी ज्या महानगर पालिके मधे आपण राहतो, त्या पालिके ची वेबसाईट वापरणे योग्य ठरेल.