डेन्मार्कची राजधानी म्हणून कोपनहेगन अधिकच सुंदर वाटतं,बागा रस्ते मॉल प्रत्येक मोठ्या कॉलनीत शाळा पाळणाघर.सगळं सुनियोजित,प्लॅन केलेलं .
मस्त कौलारू घरात मागे पुढे अंगणात ,सफरचंद लगडलेल्या झाडात हे राहतात,आपण "खेड्यामधले घर कौलारू" ऐकण्यात समाधान मानत राहिलोय.
शेतजमीनी पण भरपूर,अथांग पसरलेल्या शेतात घरं, शेजारी शेजारी असलेल्या शेताला मुख्य म्हणजे बांध नाहीतच...."आपल्याकडे बांधावरून होणाऱ्या भानगडी निस्तरताना जन्म संपतो नाहीतर कोर्टाच्या पायऱ्या चढता झिजतो."
घाई गर्दी धक्काबुक्की पळापळ हे शब्द यांच्या डॅनिश डिक्शनरी मध्ये नसावेत असं वाटून जात.
आज या लोकांच्या स्वभावाचे वाटलेलं विशेष. आपण विशेषकरून पुणेकर😢... सतत दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावतो.. न कळत तर कधी चक्क सवय म्हणून तर कधी रिकाम्यावेळेचा उदयोग म्हणून....त्यांचं काय चाललंय ,काय घडतंय काय बिघडतय...,हा उदयोग होऊन जातो.जगण्याचा एक भाग म्हणून स्वीकारून टाकतो आपण.
त्याच्या विरुध्द इकडे ,माणसं आपल्या कामात,आपल्या मस्तीत आपल्यात गुंग....प्रत्येकात मला चक्क देवानंद दिसतो म्हणजे त्याची वृत्ती दिसते.
"हर फिक्र को धुएमें
उडाता चला गया"
हातात खरंच सिगरेटचा धुआ असतोच ही गोष्ट नमूद करतेच.पण उगाच वेगळे दिसतोय म्हणून बघणार नाहीत.पण माझ्या लखनवी ड्रेस ला
"सो बुटीफुल.."
म्हणायला पण मागेपुढे पाहणार नाहीत. आपल्याला यांच्याबद्दल काय वाटतं" हे म्हणजे स्वैर,पार्टी, ट्रिप्स करणारे भटकणारे,तोकडे कपडे घालणारे....बस्स इतकंच पाहिलं आपण.तेच घेतलं.पण इथल्या सवयी,पद्धती या पाठोपाठच्या तीन वर्षीच्या ट्रिप मध्ये पहाते आहे"कमालीचे टापटीप,कोणतंही काम करायला तयार,सकाळी 6 ला काम सुरू,अकराला थोडं जेवण ,पाच ला काम सम्पलेलं आणि सात साडेसातला बागेत डिनर,ड्रिंक्स .संपला दिवस.
वीक एन्ड ही पण आपण आवडीनं उचललेली यांची गोष्ट.आपला विक एन्ड आपण भरपूर खाणं,पिणं,आराम याला म्हणतो,इथे भटकंती जवळचे बीच सायकल रपेट,पोहून दमूनजाणं,फूटबॉल खेळणं याला विक एन्ड म्हणतात.हे ऊर्जा घेतात या वीक एन्ड पासून आणि आपण वीक होऊन जातो.उद्या काम सुरू बोअर असा भाव पण इथे आता फ्रेश शुक्रवार पर्यंत भरपूर काम ही मानसिकता. लोकांची।
नजर उगाच शरीरावरुन फिरत नाही सगळं ओपन,झाकून नाही,फारतर साडी वेगळी वाटली तर कुतूहल म्हणून कटाक्ष पण....आपल्याकडे डोळे फाडून बघणं म्हणजे काय याचा अनुभव आपल्याला हवा असो नसो ,तो येतोच.वर परत "काय बघतोय...?म्हणून हाणामारी होते, असल प्रकरण इथे नाहीच.ना पोलीस चौक्या ना पोलीस......"अपनेही धूनमे मगन ये गोरे गोरे ...छोरे..."
पण खरं सांगू"काय ग विनया,दिसली नाहीस बरेच दिवसात,बरी आहेस ना ग,असं डहाणूकर गल्ली चार मध्ये जाता येता विचारणार कुणी भेटत रहातो ,आता कुठे ग निवेदन ?ऐकावस वाटतं बघ,मुठवर मास वाढवणारी आपुलकी प्रेम असत ना,तेच बरं वाटत.आपलेपणा आपुलकी इकडे नाही मिळणार,आपल्या पुण्यात मिळते तशी.
मंडळी डोळे ओलावले..
पुण्याच्या तुमच्या आठवणीनं......म्हणून थांबते.
विनया देसाई,कोपनहेगन
(डेन्मार्क)