दोन नंबर लक्षात ठेवणे अत्यंत गरजेच आहे, आणि ते म्हणजे १८१३ आणि ११२. (विषबाधा संबंधित नंबर लक्ष्मी कडन घेणे)
१८१३ हा नंबर साधारण संध्याकाळी ५ – सकाळी ८ पर्यंत बर्याच आजारांना वापरू शकतो. बर्याच वेळा फोन वर मोठी रांग असते, म्हणून अंदाजे १० मिनिटे तरी थांबावं लागत. फोन करण्या आधी CPR नंबर तयार ठेवावा लागतो, आणि आजाराची माहिती चोख देणे फायदेशीर ठरते. आजारपणावर अवलंबून आहे कि रुग्णालयात बोलावल जात कि नाही.
जीवघेण्या आजारांसाठी ११२ नंबर आहे. इथे सुद्धा प्रथम CPR नंबर आणि मग आजाराची सविस्तर आणि चोक माहिती देणे अत्यंत गरजेचं आहे. बहुतेक वेळा आम्बुलांस पाठवली जाते, आणि त्या साठी घराचा पत्ता चोख देणं फ्हार गरजेचं आहे.