ह्या देशात दोन प्रकारे राहण्याची सोय करू शकतो, घर भाड्यावर किवा विकत घेऊन. नुकतच आगमन झाल्यानंतर फक्त भाड्यावर राहू शकतो, पण दोन वर्षांचा निवास झाल्यानंतर आणि नोकरी च्या स्थिरतेवर घर विकत घेण्याची शक्यता निर्माण होते.
घराच भाड परिसरावर अत्यंत अवलंबून अस्त. कोपनहेगन च्या मध्य भागी आणि काही बाहेरचे परिसर खूप महाग आहेत. मुंबईची तुलना करायची झाली तर हे परिसर कोलाबा, जुहू, वांद्रे, मलबार हिल, पाली हिल सारखे महागडे आहेत. शहर विविध पिनकोड मधे विभागल आहे. साधारण पिनकोड १००० – २१०० मधे असण्यार्या जागा खूप महाग आहेत. ह्या पिनकोड च्या आवारात, आणि थोडे बाहेरचे परिसर, म्हणजेच चार्लोतंलुंड, हेलेरूप, क्लाम्पन्बोर्ग, गेन्तोफ्ते ला अंदाजे ९० मीटर चौ. (म्हणजेच साधारण ९६८ स्क़्वैर फुट) घराला १५००० – २०००० दानिश क्रोनर (म्हणजेच साधारण १५०००० – २००००० रुपये) महिना भरावे लागतात. पिनकोड २२०० पासन ह्याच आकाराच्या घराला अंदाजे १०००० – १४००० दानिश कक्रोनर भरावे लागतात.
भाड्याच घर शोधन खूप कठीण आहे. ह्या वेबसाईट उपयुक्त आहेत.
कोपनहेगन मधे घर मिळवण्याची स्पर्धा फार बिकट आहे, म्हणून हाती लागलेल्या घराला फार विचारपूर्वकच नाकारण योग्य ठरेल. बर्याच वेळा भाषेचा अडथळा येतो, आणि स्थानिक दानिश भाषिक लोकांची मदत घेण उपयुक्त ठरत.
घर विकत घेण्यासाठी चं कर्ज बेंक कडनं मिळत. घराच्या किमतीच्या कमीतकमी ५ % भांडवल स्वतःला उभ करायला लागत. गेले बरेच वर्ष बेंकेच व्याज अत्यंत कमी आहे, म्हणून घर विकत घेण फार आकर्षित ठरल आहे. उदाहरणार्थ, ३० वर्षाच्या कर्जाच्या अवधी आणि ठरलेल्या हफ्त्यांवर २ % च्या व्याजवर सुद्धा कर्ज मिळू शकत. बदलते हफ्ते चं कर्ज घेतलं तर व्याज १ % पेक्षा कमी आहे.
विकतच्या घराचे दोन प्रकार आहेत, पूर्ण मालकी (ejerbolig) आणि भागीदारी मालकी (andelsbolig).
पिनकोड १००० – २१०० च्या आवारात, आणि थोडे बाहेरचे परिसर, म्हणजेच चार्लोतंलुंड, हेलेरूप, क्लाम्पन्बोर्ग, गेन्तोफ्ते ला अंदाजे ९० मीटर चौ. (म्हणजेच साधारण ९६८ स्क़्वैर फुट) घराला ५,०००,००० – १००,०००,००० दानिश क्रोनर (म्हणजेच साधारण ५०,०००,००० – १,०००,०००,००० रुपये) भरावे लागतात.
ह्या वेबसाईट उपयुक्त आहेत.
वरच्या वेबसाईट वरचे दलाल विक्रेतांच्या बाजूने असतात. विकत घेणाऱ्यांच्या बाजूचे दलालही असतात, जे आपल्याला चांगला फायदा करून देतात. आपल्या फायद्यात ह्या दलालांचा फायदा असतो, कारण त्यांना आपल्याला मिळालेल्या फायद्यात्न पैसे मिळतात. https://koebersmaegler.dk/ वर हे दलाल मिळू शकतील.
ह्या प्रकारच्या घरांना पूर्ण मालकीच्या घरांच्या तुलने मधे फार कमी किंमत भारी लागते, साधारण पूर्ण मालकीच्या घरांच्या एक दशमौंश (१/१०) किंमत, पण नावा प्रमाणे कधीच पूर्ण मालकी मिळत नाही. ह्या घरांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अतिशय सुंदर परिसरात आणि शहराच्या मध्य भागी जागा परवडू शकते. थोडक्यात माफक भांडवलात आयुष उपभोगायच असेल तर हा पर्याय अत्यंत योग्य आहे. पण ह्याचाच अर्थ असा पण आहे कि आयुष भर घराच्या माध्यमातन तरी भांडवल साठवता येणार नाही.